नमस्कार मित्रःहो, अद्वैत या ब्लॉग च्या माध्यमातून आदरणीय गुरुजी प्रकाशजी म्हात्रे यांच्या कविता, विचार असंख्य लोकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. श्री प्रकाशजी म्हात्रे चे पेशाने शिक्षक असून संत निरंकारी मिशनचे प्रचारक आहेत.
प्रकाशजी आपण पुढील पुरस्कारांनी सन्मानित आहात...
धर्मरत्न" महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ - २०१६
"आदर्श शिक्षक" रायगड जिल्हा परिषद - २००५
"आदर्श शिक्षक" म्हसळा पंचायत समिती (शिक्षण विभाग ) - १९९८
"विद्या भूषण" व "समाजभूषण" पुरस्काराने दैनिक म्हसळा टाईम्सने सन्मानित
About us
💦💦 स्मरोनिया काय💦💦
चित्ती नसता भगवंत स्मरोनिया काय |
जरी अंगसंग होय व्यापोनिया ||
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
विन्मुख होऊन करी देवाचे भजन |
जाणावें ते रटन अवडंबरीचे ||
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
एकात्म न होता देवासवे मन |
वाया ते पूजन अज्ञानाचे ||
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
प्रीती न जडता स्वरूपावरी सत्य |
उपासना ती मिथ्य फोलची होय ||
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
अस्थिर हे जाणावें जीवनाचे रंग |
न होता निःसंग संसारीया ||
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
"प्रकाश"तोचि "धन्य"देवामाजी लीन |
इहलोकी तो अभिन्न देवचि होय ||
स्मरोनिया काय
Subscribe to:
Comments
(
Atom
)







