सूचना...! ब्लॉग अपडते होत आहे...

तेजाचे ते तेज


⚜⚜ तेजाचे ते तेज

 तेजाचे ते तेज गुह्यार्थाचे गुह्य |
 भरले आन्तर्बाह्य पारब्रम्ह ||

 निरावलंब तोचि आनंदाचे वर्म |
 सनातन ते ब्रम्ह अनादि अनंत ||

 तयाचिये सत्ते जगाचा पसारा |
 जिवंत तोचि सारा ब्रम्हांड दिसे ||

 धनी या विश्वाचा सर्वात्मक दाता
 नसे दुःख वार्ता त्याचीये कृपे ||

 निराकार तोचि निर्विकार सत्य |
 सर्व दिशा नित्य व्यापुनिया असे || 

 ऊत्तम या देवासी ज्ञानचक्षु पहावे |
 तरी "प्रकाश"या वंदावे सद्गुरुनाथे ||

No comments

No comments :

Post a Comment