तेजाचे ते तेज...

⚜⚜ तेजाचे ते तेज ⚜
तेजाचे ते तेज गुह्यार्थाचे गुह्य |
भरले आन्तर्बाह्य पारब्रम्ह ||
निरावलंब तोचि आनंदाचे वर्म |
सनातन ते ब्रम्ह अनादि अनंत ||
तयाचिये सत्ते जगाचा पसारा |
जिवंत तोचि सारा ब्रम्हांड दिसे ||
धनी या विश्वाचा सर्वात्मक दाता |
नसे दुःख वार्ता त्याचीये कृपे ||
निराकार तोचि निर्विकार सत्य |
सर्व दिशा नित्य व्यापुनिया असे ||
ऊत्तम या देवासी ज्ञानचक्षु पहावे |
तरी "प्रकाश"या वंदावे सद्गुरुनाथे ||
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment