निर्धार हां पक्का
🔸🔹निर्धार हां पक्का🔹🔸
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
निर्धार हा पक्का करोनी चालावे |
माघारी न फिरावे परमार्थ पंथे
||
ज्ञानाचिये योगे विवेका जिंकावे |
अनासक्त व्हावे संसारा माजी ||
काम-क्रोध- लोभ जीवेशी मारावे |
सदगुण ते धारावे जीव-भावे ||
गुणदोष कधी कुणाचे न पहावे |
सद्भावनेने भरावे चित्त सदा ||
अखंड करावे नामाचे ते स्मरण |
सत्स्वरूपाचे स्फुरण असू द्यावे ||
उन्नतीच्या वाटे सदा धाव घ्यावी |
उज्वळता ती मुरावी रोमरोमी ||
निंदा-द्वेष नको कुणाचा मत्सर |
सर्वाघटी सर्वेश्वर समजून यावा ||
"प्रकाश" गुरुचे होऊनि "पुजारी"|
अद्वैताची ती वारी अनुभवावी ||
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment