सूचना...! ब्लॉग अपडते होत आहे...

तत्त्वरूपी आम्ही

तत्त्वरूपी आम्ही

 तत्त्वरूपी आम्ही झालो एकाकार |
 ऊपाधिचा भवसागर ऊल्लंघोनी || 

 राहिलो निवांत अनंती एकांत |
 ओलांडीला प्रांत इंद्रियांचा  ||

 विसावले चित्त निमाली ती भ्रांत |
 वासनेचा आकांत स्थिर जाहला ||

 स्वरूपी मिळालो आकारी असोन |
 जाहले समाधान अनिर्वाच्च  ||

 कृपावंत होता सद्गुरु दातार |
 "प्रकाशाचा"विस्तार अनुभवा आला || 
No comments

No comments :

Post a Comment